भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान लक्ष्यपूर्तीकडे : राहुल महाडिक

सध्या भाजप सदस्यता नोंदणी जोरात सुरु आहे. जास्तीत जास्त हि नोंदणी होण्यासाठी कार्यकर्ते जोमाने काम करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील रेठरेहरणाक्ष बोरगाव जिल्हा परिषद गटात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान सर्वत्र अत्यंत प्रभावीपणे सुरू असून येत्या काही काळातच त्याची लक्ष्यपूर्ती होईल. असा विश्वास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि भाजपा नेते राहुल महाडिक यांनी व्यक्त केला. राहुल महाडिक म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे कार्य समाजातील तळागाळात पोहोचले आहे.

पक्षाचे संघटन मजबूत व्हावे यासाठी राबवलेल्या नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजवर या अभियानांतर्गत ३६ हजार सदस्य नोंदणीचा टप्पा पूर्ण झाला असून आगामी काळात ५८ हजारांचे लक्ष्य असणार आहे. या लक्ष्यपूर्तीसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यम ातून कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणार असल्याचा विश्वास राहुल महाडिक यांनी व्यक्त 
केला.

यावेळी पक्षविस्तारक पार्थ शेटे, दिनकर पाटील, दिपक पाटील, पोपट देसाई, शिरटेचे गोरख पाटील, पुरुषोत्तम पाटील, रावसाहेब पाटील, धनंजय पाटील, संजय हिंगणे, रेठरेहरणाक्षचे सुरज मोरे, राहुल मोरे, शरद अवसरे, दयानंद पवार, राजू बल्लाळ, भवानीनगरचे अजय अवसरे, चंद्रकांत रसाळ, किल्लेमच्छिंद्रगडचे सचिन कदम, विशाल पाटील, बिचुदचे राहुल जाधव, नामदेव जाधव, मधुकर डिसले, अविनाश पाटील, संजय डीसले, युवराज कदम, शशिकांत जंगम, सुनील सोनवणे, शशिकांत पाटील, रमेश पाटील, ताकारीतील बैठकीसाठी दुधारीचे माजी उपसरपंच सुशील सावंत, बोरगावचे गुरुप्रसाद पाटील, साटपेवाडीचे मा. सरपंच संतोष साटपे, मसुचीवाडीचे शहाजी माने, जुनेखेडचे महाडिक युवाशक्ती अध्यक्ष विनायक जाधव, अर्जुन वाटेगावकर, संपर्कप्रमुख अमोल पाटील, युवराज कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.