सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभेचा तिढा वाढला आहे. सांगोलाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख सांगोला विधानसभेसाठी आज शरद पवार याची भेट घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.सांगोल्यात अजित पवार गटाचे दीपक साळुंखे यांनी काल उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत केला आहे. त्याची उमेदवारी जवळपास निश्चित मानले जाते आहे.
त्यामुळे शेकापचे नेते नाराज सांगोल्याची जागा महाविकास आघाडीने शेकाप सोडावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली होती, अनिकेत देशमुख बाबासाहेब देशमुख यासाठी आग्रही आहेत. बाबासाहेब देशमुख,अनिकेत देशमुख आणि शरद पवार यांना भेटीची वेळ मागितली असून आज मुंबईमध्ये शरद पवारांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.