पेठ (ता. वाळवा) येथील मुस्लीम समाज शादीखाना बांधकामासाठी ८५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्या कामाचा शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक अतुल पाटील यांच्या हस्ते
झाला.
यावेळी आ. नाईक म्हणाले, मुस्लीम समाजासाठी शादीखाना कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यावेळी सरपंच डॉ. सुभाष भांबुरे, उपसरपंच शीतल पवार, माजी कृष्णा बँकेचे संचालक फिरोज ढगे, मुस्लीम समाजाचे अध्यक्ष जावेद ढगे, उपाध्यक्ष इसाक संदे, सचिव आयूब जमादार, संचालक अरीफ जमादार, वजीर संदे, रिझवान जमादार, इफ्तेकार नदाफ, मेहबूब शेख, अॅड. शमशुद्दीन संदे, आत्मशक्ती पतसंस्थेचे उपाध्यक्ष शेखर बोडरे, कृष्णा बँकेचे संचालक नामदेव कदम, माजी उपसरपंच राहुल पाटील, तुळशीदास पिसे, डॉ. अरुण पवार, नायलवाडीचे सरपंच सुनील आत्मशक्ती पतसंस्थेच्या अध्यक्ष डॉ. पूनम पाटील, अर्चना गुरव, रविकिरण बेडके, खलील मुल्ला, अमोल भांबुरे यांच्यासह मुस्लीम व इतर समाजाचे नागरिक उपस्थित होते. कचरे,