२००८ साली आलेल्या आमिर खानच्या ‘गजनी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं. आमिर खानच्या या सिनेमाने इतकी कमाई केली की सध्या सुरु असलेल्या १०० कोटी कमाईचा क्लब उघडण्याचं योगदान आमिर खानच्या ‘गजनी’ सिनेमाला जातं.आता ‘गजनी’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण लवकरच ‘गजनी’चा सीक्वल अर्थात ‘गजनी २’च्या शूटींगला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे ‘गजनी २’मध्ये साऊथमधील मोठा सुपरस्टार आमिरसोबत काम करणार आहे.
‘गजनी २’ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात पुन्हा एकदा आमिर खान प्रमुख भूमिकेत दिसणार यावर शिक्कामोर्तब झालंय. सिनेमाच्या सीक्वलची कथा वेगळी असणार आहे. अशातच ‘गजनी २’मध्ये आमिर खानसोबत साऊथमधला एक मोठा सुपरस्टार अर्थात अभिनेते सुर्या दिसणार असल्याची शक्यता आहे. ‘गजनी’ हा मूळ सिनेमा साऊथमध्ये पहिल्यांदा बनवला गेला. या सिनेमात सुर्याने प्रमुख भूमिका साकारली होती.
त्यामुळे आता ‘गजनी २’मध्ये आमिर आणि सुर्या आमनेसामने येणार आहेत.असंही बोललं जातंय की ‘गजनी २’ हा सिनेमा साऊथ आणि हिंदीमध्ये वेगवेगळा बनवला जाणार आहे. यामध्ये साऊथमध्ये सुर्या आणि बॉलिवूडमध्ये आमिर खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. आता ‘गजनी २’मध्ये जर आमिर आणि सुर्या एकत्र झळकले तर चाहत्यांना पर्वणी मिळणार यात शंका नाही.