इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दाद) यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी महायुती घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साधेपणाने दाखल केला. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, भाजपाचे जेष्ठ नेते सी.बी.पाटील,भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील प्रमुख उपस्थितीत होते. इस्लामपूर विधानसभा मतदार संघात गेली ३५ वर्षे येथील अकार्यक्षम नेतृत्वामुळे मतदार संघाचा विकास रखडला.
ऊसदर, दूध उत्पादकांचे प्रश्न, युवकांची बेरोजगारी, अशा विविध प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे. मला खात्री आहे की, ही निवडणूक राज्यातील ऐतिहासिक निवडणूक होईल. हा तालुका क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने चालणारा तालुका आहे. त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच क्रांती घडलेली दिसून येईल. कारण ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. २०१६ लाही इस्लामपूर नगरपालिका निवडणूक जनतेने हातात घेतली होती.
त्यानंतर ३१ वर्षांची प्रस्थापितांची सत्ता जनतेने पलटी केली होती. याच भावना आता मतदारसंघातील ५७ गावातून दिसून येत आहे. समाजकारणातुन राजकारण हा माझा प्रवास मतदार संघातील जनतेने अनुभवला आहे,येथील व्यवस्था बदलयाची आहे,प्रत्येकाला मान,सन्मान मिळालयला हवा,मतदार संघाचे विकासाचे व्हिजन घेऊन मी मतदारांच्या समोर जात आहे. या निवडणुकीत जनतेने मला आशीर्वाद द्यावेत. नक्कीच त्यांच्या विश्वासाला पात्र राहून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ विकसित करेन, असा मी जनतेला शब्द देतो. असे यावेळी निशिकांत भोसले-पाटील पाटील म्हणाले.
महायुतीतील स्थानिक नेत्यांना घेऊन अर्ज दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून होत्या. त्यामुळे महायुती घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. परंतु दोन-तीन दिवसात राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळी व इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल करणार आहोत, असेही शेवटी निशिकांत भोसले-पाटील म्हणाले