विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली. त्यात सांगोला मतदारसंघात दीपक आबा साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दिपकआबा साळुंखे पाटील यांनी प्रवेश केल्यापासून संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांत एकच उत्साह संचारला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच दीपकआबा साळुंखे पाटील यांनी हाती मशाल घेऊन जवळा गावात रॉयल एन्ट्री केली. त्यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. दीपकआबांना खांद्यावर उचलून घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावातून मिरवणूक काढली. दुपारपासूनच वाड्या वस्त्यावरील कार्यकर्ते जवळा गावात गर्दी करू लागले होते. सायंकाळी दीपकआबा साळुंखे पाटील यांचे जवळा गावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
गावाच्या वेशीपासून त्यांच्या स्वागत मिरवणुकीला सुरुवात झाली. हलगीच्या कडकडाटात, फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. एकच वादा दीपकआबा या घोषणांनी परिसर दणाणून गेला.एवढी वर्षे इतरांसाठी काम केले. आता दीपकआबांना विजयी करायचे या ईर्षेने कार्यकर्ते पेटले आहेत.
कोणत्याही परिस्थितीत दीपकआबांना आमदार करून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार करत दीपकआबांनी आतापर्यंत केलेली कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही देत जवळा व आसपासच्या वाड्यावरस्त्यावरील नागरिकांनी दीपक आबांच्या प्रचारासाठी २७ लाख रुपयांची वर्गणी जाहीर केली.