लोणार समाज बांधवांचा महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना जाहिर पाठींबा! राष्ट्रवादीला खिंडार…

स्व. आमदार अनिलभाऊंच्या आदर्श कामाच्या पद्धतीनुसारच आम्ही आज कार्यरत आहोत याच आमच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्हाला भरघोस पाठिंबा मिळत आहे. लोकांनी जे प्रचंड प्रेम दिले आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक अमोल बाबर यांनी केले. आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी पंचायत समिती सदस्य कल्लापा कुटे नाना, नवनाथ कुटे, अमोल शेठ कुटे यांच्यासह लोणार समाज बांधवांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केला व महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना जाहिर पाठींबा दिला.


यावेळी तुकाराम कुटे, लक्ष्मण कुटे, दिगंबर कुटे, अजिनाथ कुटे, बाळासो कुटे अक्षय कुटे, गणेश कुटे, विकास कुटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साहेबराव पाटील, दत्तात्रय पाटील, राजेश नांगरे, मंथन मेटकरी, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, उपसरपंच मुन्ना तांबोळी, पुजारवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब मोरे, माजी सरपच ब्रह्मदेव व्होनमाने, विकासराव मोरे, बाळासाहेब होनराव, माणिक नष्टे, श्रीरंग शिंदे, बाळासाहेब नळ, दत्ता जावीर, पांडुरंग महाराज मोटे, विष्णूपंत यादव, मनोज उंट, योगेश नष्टे. सुहास कडव, शेखर मिसाळ, महादेव पुसावळे, देवाप्पा पुस- वळे, अनुप रावण, जीवन मोरे, भगवान माने, महादेव रणदिवे, महेश साळी, संजय वाघमारे, मुनीर तांबोळी उपस्थित होते.