गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील गावागावांमध्ये २५५ कोटींची कामे केली आहेत. हजारो कोटींच्या गप्पा न मारता जेवढी कामे केली, तेवढीच सांगत जनतेसमोर जात आहे.जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला आहे. निधी देताना गट-तट पाहिला नाही. त्यामुळेच जनता पुन्हा एकदा मला साथ देईल,’ असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजू आवळे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौ. प्रियांका राजूबाबा आवळे आणि सौ. उज्वला संजय आवळे यांनी हुपरी येथील नागरिक, माता भगिनींची भेट घेत विविध विषयांवर संवाद साधला. राजूबाबांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात २५५ कोटींची विविध कामे केली आहेत. त्यामुळे यावेळेसही राजूबाबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले. तसेच राजूबाबांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्याचा दृढ निश्चय गावकऱ्यांनी केला.