विकासाची आश्वासने देत उमेदवार मतदारांच्या भेटीला

सांगली जिल्ह्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह बंडखोरांनी प्रचाराला वेग दिला आहे. मतदारसंघाच्या विकासाचे आश्वासन देत दिवसभरात मतदारांच्या गाठीभेटी, वैयक्तिक बैठका, रॅलीवर उमेदवारांनी भर दिला.

मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून आले.खानापूर-आटपाडी मतदारंसघात राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांनी विटा शहरातील मतदारांची भेट घेतली. त्यांच्या प्रचारार्थ गुरुवारी जयंत पाटील यांची सभा होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांनी खानापूर परिसरात तर बंडखोर राजेंद्र देशमुख यांनी आटपाडी शहरात प्रचार फेरी काढली.