गतवेळच्या निवडणुकीत नरंदे गावच्या ग्रामस्थांनी सर्वाधिक मते देऊन माझा विजय सोपा केला होता. गावातील सर्व रस्त्यासाठी तसेच अन्य विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी गेल्या पाच वर्षात दिला. येणाऱ्या काळात नरंदे गावासाठी भरघोस निधी देण्यात येईल. गेल्यावेळीच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही सर्वाधिक मते नरंदे गावचे मतदार देतील असा विश्वास आमदार राजूबाबा आवळे यांनी व्यक्त केला.
गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद पदयात्रेचे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी व वाद्याच्या गजरात उत्साहात जल्लोषात स्वागत केले. यावेळी नेते राजकुमार भोसले, सरपंच पूजा करणे, बाळासो नारायण भंडारी, महादेव माने, जगन्नाथ खोत, वसंत भंडारी, भीमराव भोरे, निवास भंडारी, नागेश भंडारी, तुकाराम अनुसे, धनपाल हरोले, बबन दादा भंडारी, विलास अनुसे, अमीर मुल्लानी, दत्ता भंडारी, चंद्रकांत भंडारी, संदीप शेटे, धनपाल भोरे, प्रकाश भोरे, धनपाल कांबळे, बबन खोत, मदन खोत, अमोल शेटे उपस्थित होते.
बुवाचे वाठार येथील पदयात्रेस मोठा प्रतिसाद लाभला. गावच्या विकासासाठी मागेल तेवढा निधी आम. राजूबाबा आवळे यांनी दिला. त्यांना भरघोस मतदान देण्यात येईल अशी माहिती उपसरपंच शंकर शिंदे यांनी दिली. यावेळी कृष्णात वाठारकर, रामचंद्र अनुसे, राजाराम अनुसे, आदिल पाथरवट, आनंदा परिट, बाजीराव इंगळे, रामचंद्र पोवार, मदन अनुसे, मलाप्पा मगदुम, संजय चौगुले, अमित मडके, दिलावर सुतार, निवृत्ती शिंदे, एम. आर. चौगुले उपस्थित होते.
