उद्धवसाहेब ठाकरे आणि दिपकआबांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी सांगोला येथील अतिविराट सभेतून केंद्रापासून ते स्थानिक आमदारापर्यंत सर्वांचेच वाभाडे काढले. उद्धवसाहेब ठाकरे आणि उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रत्येक वाक्याला उपस्थित हजारो नागरिक, महिला आणि सर्वांनीच टाळ्या आणि शिट्ट्यांची दाद दिली. अत्यंत जोषपूर्ण वातावरणात सांगोल्यातील ही सभा संपन्न झाल्याने संपूर्ण सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आणि जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

गेली 30 ते 35 वर्ष मी सांगोला तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनात काम करत आहे तालुक्यातील जनतेचे प्रश्न मला नेमकेपणाने माहीत आहेत सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात मी कायम सहभागी असतो. आघाडीच्या राजकारणात आजवर फक्त माझा वापर झाला आणि माझ्यावर अन्याय झाला परंतु 35 वर्षांच्या राजकारणात परिणामाची परवा न करता खऱ्या अर्थाने उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेनेने आपल्याला न्याय दिला साहेब तुम्ही फक्त मला ताकद द्या मी सांगोला विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहराच बदलून टाकतो असे दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले.