राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (दि. 15) कोल्हापूर दौर्यावर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात तीन मतदारसंघांत उमेदवार आहेत.शरद पवार यांची सभा घेण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, एकाच टप्प्यात निवडणूक असल्यामुळे प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांवर सभा घेण्यास मर्यादा आल्या आहेत.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात पवार यांनी कोल्हापूर दौर्यावर येण्याचे मान्य केले आहे. शुक्रवारी सकाळी इचलकरंजीत पवार यांचे आगमन होईल. येथे मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. त्यानंतर डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचारार्थ चंदगड, तर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार समरजित घाटगे यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज येथे सभा होणार आहे.
