इस्लामपूर येथे एस. टी. आगारात कामगारांची निदर्शने

महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी इस्लामपूर आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली. राज्य परिवहन महामंडळाकडे प्रलंबित असलेल्या विविध स्वरूपाची थकबाकी आणि वारंवार करण्यात येणाऱ्या मागण्या मान्य होत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. त्यास कामगारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. थकबाकी त्वरित द्यावी, २०१८ च्या महागाई भत्याची रक्कम, २०१६ ते २०२० या कालावधीत वेतनवाढीच्या घरभाडे वाढीचा दर ८, १६, २४ टक्के करून त्याचीही थकबाकी द्यावी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह मिळावा.

मागणीनुसार त्वरित उचल द्यावी अशा प्रमुख मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव खोत, आगार अध्यक्ष आर. बी. पाटील, सचिव दीपक रायजादे, विभागीय संघटक सचिव अरुण दिंडे, क्यू आर टी मेंबर मोबीन पटवेकर, जाफर मुजावर आगाराचे उपाध्यक्ष अमोल दिंडे, सदाशिव राऊत, सुनील कोळेकर, अर्चना कुंभार, अश्विनी खाडे, संतोष मंडले, कृष्णाजी पाटील, संदीप सव्वाशे, जालिंदर कुटे, श्रीनिवास रासकर, एम.टी. ढगे, चंद्रकांत कणसे, प्रदीप मुळीक व कर्मचारी उपस्थित होते.