सांगोला तालुक्यातील आरोग्य केंद्रावर ॲम्बुलन्स नादुरुस्त झाल्या होत्या त्यामुळे आरोग्य विभागाने सोलापूर आरोग्य विभागास नवीन ॲम्बुलन्सची मागणी केली होती त्यानुसार सांगोला तालुक्यातील नाझरा, अकोला, महूद, कोळा, जवळा व घेरडी अशा सहा ठिकाणी नवीन ॲम्बुलन्स सांगोला येथील पंचायत समितीमध्ये शनिवारी दुपारी दाखल झाल्या होत्या, या ॲम्बुलन्सचे उद्घाटन करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले होते त्यामध्ये विद्यमान आ. बाबासाहेब देशमुख यांनाही निमंत्रण दिले होते त्यानुसार आ. डॉ. देशमुख हे शनिवार दि.३० नोव्हेंबर रोजी सांगितलेल्या वेळेवर उपस्थित झाले.
परंतु विद्यमान आमदार येण्याच्या अगोदरच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर यांनी ॲम्बुलन्सचा उद्घाटन सोहळा करून घेतला, आ. डॉ. देशमुख हे उद्घाटन साठी आले परंतु त्या अगोदरच उद्घाटन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उद्घाटन झाले आहे. मी परत कशाला उद्घाटन करू असे म्हणून निघून गेले. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निमंत्रणानुसार आमदार आले. परंतु ते येण्याच्या अगोदरच उद्घाटन सोहळा उरकल्याने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.तर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खांडेकर यांची चौकशी व कारवाई करून गडचिरोली ला बदली करण्याची नागरिकाकडून मागणी केली जात आहे.