उद्या सांगोल्यात ईव्हीएम विरोधात धरणे आंदोलन…

नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीने विजय प्राप्त केला. परंतु या विधानसभा निवडणुकीत EVM चा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. EVM द्वारे मतदान लोकशाहीसाठी मारक आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम चा वापर न करता मतपत्रिकेद्वारे निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी उद्या मंगळवारी म्हणजेच दहा डिसेंबरला सांगोला येथे समविचारी, बहुजनवादी, संविधानवादी पक्ष, सामाजिक संघटना, संस्था यांच्यातर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी दिली.

या आंदोलनामध्ये बहुजन क्रांती मोर्चा, बुद्ध भीमराज बहुउद्देशीय सामाजिक संघटना, अस्तित्व सामाजिक संस्था, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, डॉ. आंबेडकर शेती विकास संस्था, सेक्युलर संघटना आदी संस्था, संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तहसील कार्यालय येथे सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. या आंदोलनात सर्व नागरिक, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.