विहिरीत पाय घसरून; पडल्याने वृद्धाचा मृत्यू

खोतवाडी येथील पुंडलिक जोती माने (वय ८२) यांचा दुपारी जेवणाच्या वेळेस हात धुण्यासाठी गेले असता तोल सुटून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, पुंडलिक माने हे सकाळी लवकर शेतीच्या कामासाठी गेले होते. दुपारच्या वेळेस तारदाळ येथे असणाऱ्या देशपांडे यांच्या विहिरीत हात धुण्यासाठी गेले होते. यावेळी पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. माने यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.