इचलकरंजी येथील खराब रस्त्यामुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. काही ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेतलेली आहेत. म्हणजेच रस्ता दुरुस्ती काही ठिकाणी सुरू झालेली आहे.
इचलकरंजी येथील डीकेटीई कॉलेज ते आमराई मार्ग चौकदरम्यानचा रस्ता अरुंद असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असते.अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. हा मार्ग रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मार्गाचे जलद रुंदीकरण व्हावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापालिका उपायुक्त तैमुर मुलाणी यांना दिले.
हा रस्ता रुंदीकरण न झाल्याने येथे वाहतुकीची कोंडी होत आहे.
आमराई मार्ग चौक ते काळा ओढादरम्यान जलवाहिन्या टाकलेल्या असून, जलवाहिन्यांसाठी केलेली खुदाई अद्यापही तशीच आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागत आहे. येथील शिक्षक कॉलनीतील रस्ता हा गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सुमारे दीड वर्षापासून खोदून ठेवलेला आहे. रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. ऋषिकेश मराठे, सचिन वरपे, विठ्ठल चोरगे, डी. डी. कुलकर्णी, प्रणव साठे आदी उपस्थित होते.
