आजपासून रुकडी येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात त्री दिवसीय शासन देवी स्थापना अनुष्ठान

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदीर येथे त्री दिवसीय शासन देवी स्थापना अनुष्ठान चे आयोजन केले असून याची सुरुवात आज मंगळवार दि. १० डिसेंबर २०२४ पासून होणार आहे. या वेळी आज मंगळवार सायंकाळी ठीक ८ वाजता सौधर्म इंद्र इंद्रायणी, रथ, घोडे आदी चे सवाल, बुधवार दि.११ रोजी दुपारी ठीक ३ वाजता गणाधीपती गणधराचार्य कुंथुसागरजी महाराज यांचे सहसंघ आगमन व माता ज्वाला मालिनी व माता पद्मावती देवीच्या मूर्तिची सह वाद्य मिरवणूक, गुरुवार दि. १२ ते शनिवार दि. १४ या तिन दिवशी मुख्य विधी विधान होणार असून सकाळी ठीक ६ वाजता मंगळवाध्यघोष, ९:४५ वाजता मुनिसंघ आहारचर्या, सकाळी ११ वाजता मुलनायक आदिनाथ भगवान, माता पद्मावती, माता ज्वालामालिनी विधान, दुपारी ठीक ३:३० वाजता मुनिसंघाचे प्रवचन, सायंकाळी ठीक ७:३० वाजता कुंकुमार्चन, सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरती आदी कार्यक्रम होणार आहेत.

तर रविवार दि. १५ रोजी सकाळी ८:२५ ते ९:२२ या वेळेत मूर्ती वरती संस्कार व वेदिवरती मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. सदर कार्यक्रम गणाधीपती गणधराचार्य कुंथुसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या आधी नेतृत्वात होणार आहेत. या वेळी लक्ष्मीमिसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचेही सानिध्य लाभणार असून सर्व विधी विधान प्रतिष्ठाचार्य दिपक उपाध्ये सांगली यांच्या तत्वधानात, स्थानिक पंडित प्रविण उपाध्ये यांच्या उपस्थितीत होणार आहेत.

दरम्यान सदर माहिती मंदिर कमेटीचे अध्यक्ष रविंद्र डिग्रजे यांनी दिली असून या कार्यक्रमाचा पुण्य लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी उपाध्यक्ष शांतीनाथ कोगनोळे, आदिनाथ किनिंगे, मनोहर पाटील, संजय खोत, शितल देसाई, जयकुमार दरी, सम्मेद चिंचवाडे, प्रमोद शिरोळे, अमित खोत, अभिजित चिंचवाडे, प्रतीक भोकरे, हर्षवर्धन कापसे आदी उपस्थित होते.