विधीमंडळात पवार- जयंत पाटलांची टोलेबाजी….

महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची सोमवारी विधानसभेत एकमतानं निवड करण्यात आली.यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना चांगलाच हास्यविनोद रंगला.यावेळी विधानसभा अध्यक्षांची किती जरब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे, याची माहिती जयंत पाटील देत होते.

यावेळी 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर अध्यक्ष नाही, आमदार, असं अजितदादा म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांनी तात्काळ सारवासारव करत वाक्य दुरुस्त केलं. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाटलांना डिवचलं.

यावेळी योग्यवेळी योग्य निर्णय, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी करताच सभागृहात हस्यकल्लोळ झाला. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.पाटलांच्या या विधानानं नव्या चर्चेला वाट मोकळी झालीये. जयंत पाटील हे अजितदादांच्या पक्षात जाणार का? अशी चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे.