नेर्लेत ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास प्रारंभ 

वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे ५२ वे वाळवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन गुरुदेव चैतन्य स्वरूप गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, डॉ. एपीजे अब्दुल कलाम नगरीत दि. ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. 
११ रोजी विज्ञान साहित्य उपक्रम मांडणी असणार आहे. १२ रोजी सकाळी ११ वाजता विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आहे. आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी आहेत. यावेळी

गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, लोकनियुक्त सरपंच संजय पाटील, उपसरपंच मनीषा माने, विष्णुपंत पवार, सचिव अवधूत कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. १३ रोजी सकाळी १० वाजता विज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धा आहेत. दुपारी २ वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ संपन्न होणार आहे. विज्ञान वाहिनी, पुणेचे संवादक विनायक दीक्षित प्रमुख पाहुणे तर विष्णुपंत पवार अध्यक्षस्थानी आहेत. विज्ञान प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या योगदानातून भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.