आजपासून रूकडी येथे अनुष्ठानचे आयोजन

हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदीर येथे त्रिदिवसीय शासन देवी स्थापना अनुष्ठानचे आयोजन केले असून मंदिराचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. याची सुरुवात गुरुवार ता. १२ पासून होणार आहे. गुरुवार ता. १२ ते शनिवार दि. १५ या तीन दिवशीय मुख्य विधी विधान होणार असून सकाळी ठीक ६ वाजता मंगळवाध्यघोष, ९:४५ वाजता मुनिसंघ आहारचर्या, सकाळी ११ वाजता मुलनायक आदिनाथ भगवान, माता पद्मावती, माता ज्वालामालिनी विधान, दुपारी ठीक ३:३० वाजता मुनिसंघाचे प्रवचन,

सायंकाळी ठीक ७:३० वाजता कुंकुमार्चन, सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरती आदी कार्यक्रम होणार आहेत तर रविवार ता.१५ रोजी ८:२५ ते ९:२२ या वेळेत मूर्ती वरती संस्कार व वेदिवरती मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचेही सानिध्य लाभणार आहे, अशी माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे यांनी दिली असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले.