विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आमदार म्हणून त्यांनी प्रथमच मतदासंघांतील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली.यावेळी प्रांताधिकारी विक्रम बांदल, पोलिस उपाधीक्षक विपुल पाटील यांच्यासह शासनाच्या सर्व खात्यांचे अधिकारी खानापूर, आटपाडी तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, विटा, आटपाडी, खानापूर शहरांच्या पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. विटा शहरात वाहनतळाची समस्या मोठी आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पोलिस व पालिका प्रशासनाने आराखडा तयार करावा. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत. पोलिसांनी अवैध धंद्यांवर वचक बसवावा अशा सूचना आमदार बाबर यांनी केल्या.
विट्यातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी वाहनतळ आराखडा तयार करण्याच्या सूचना
