कृष्णाकाठ बहरला हिरवाईने !

वाळवा तालुक्यातील बोरगावात गेल्या दहा वर्षांपूर्वी हरित अभियानाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून बोरगाव ग्रामपंचायतीने वृक्षारोपणाचा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. भविष्यात बोरगाव हे झाडांचे गाव म्हणून नवीन ओळख निर्माण होईल यासाठी येथील नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत.

वाळवा तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे 1300 झाडांचे वृक्षारोपण करून हरित बोरगाव सुंदर बोरगाव हे अभियान सरपंच जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक गतिमान केले जात आहे. कृष्णा नदी काठावर अनेक विविध प्रकारची १३०० झाडे लावून पर्यावरणाचे संवर्धन देखील एक प्रकारे होत आहे.