इचलकरंजीत बांधकाम कामगारांना भांडी संचचे वाटप…

महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या २२८ बांधकाम कामगारांना भांडी संच संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र बांधकाम कामगार सेना इचलकरंजी येथे वाटप करण्यात आले. सदरच्या बांधकाम कामगारांना भांडी संच जिल्हा संघटक सद्दाम मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख, शहनवाज चाँदकोटी, शहराध्यक्ष वाहिद कातणकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा बेगम नदाफ, सलमा शेख, पूजा पोवार, शाहीर खानापुरे, सुवर्णा शिंदे, सुमित्रा टोणे, सागर आगे, बाबू पुजारी, राहुल कडगावे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम म्हणाले, सानुग्रह अनुदानाबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्याप्रमाणे माजी कामगार मंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे ताबडतोब बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदान ताबडतोब बांधकाम कामगारांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने भव्य असा मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावरती काढण्याचा इशारा दिला.