सांगलीमध्ये हिट अ‍ॅण्ड रनचा प्रकार, डंपरच्या धडकेत दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

सांगलीमध्ये हिट अ‍ॅण्ड रनचा प्रकार घडलाय. डंपरच्या धडकेत दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. दोन वर्षाचा चिमुकला खेळता खेळता रस्त्यावर आला, त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्याला उडवले.या धडकेत त्या चिमुकल्याचा जागीच अंत झाला.सांगलीमधील कुपवडजवळच्या झोपडपट्टीमध्ये हा प्रकार घडलाय. या अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धावत येत मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या अपघाताची बातमी माधवनगरमध्ये वाऱ्यासारखी पसरली, परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

सांगलीच्या कुपवड परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मनोज ओंकार ऐवळे या चिमुकल्याचा डंपरच्या चाकाखाली आल्यामुळं आज सकाळी मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर डंपर चालकाने पलायन केलं आहे. घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावानं डंपर फोडला आहे. तसेच, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली, आणि आरोपीचा शोधकार्य सुरूय.सांगलीच्या कुपवाड परिसरातली अहिल्यानगरमधून माधव नगरला जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत ओंकार ऐवळे हा दोन वर्षाचा चिमुरडा राहत होता.

अचानक तो खेळत खेळत रस्त्यावर आला आणि डंपरच्या चाकाखाली आला. घटना घडल्यानंतर डंपर चालकानं पलायन केलं. तर संतप्त जमावानं मिळून डंपरची तोडफोड केली. कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनेची माहिती घेत पंचनामा केला. तसेच डंपर ताब्यात घेण्यात आलंय. यासह चालकाला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना केलं असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी सांगितलं. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी रस्ता अरूंद असल्यानं ही घटना घडली असल्याचं सांगितलं. प्रशासनाने या रस्त्यावरील जड वाहतूक बंद करावी अशी मागणी देखील केलीय.