इचलकरंजीतील शिवाजीनगर आणि शिरोळ पोलिस ठाणे राज्यातील ‘सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे २०२२’ म्हणून घोषित करण्यात आली. पोलिस महासंचालकांच्या मान्यतेने विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी हे २०२२ चे पुरस्कार तीन दिवसांपूर्वी जाहीर केले आहेत. यात राज्यातील आणखी तीन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.
या दोन्हीसह एकूण पाच पोलिस ठाण्यांच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांना मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह व रोख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
