इचलकरंजीत वंचित बहुजन आघाडीतर्फे निर्धार सभा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची शुक्रवारी (ता. ८) इचलकरंजी येथे राजकीय न्याय हक्क निर्धार सभा होत आहे.अण्णाभाऊ साठे मैदानावर सायंकाळी चार वाजता सभा होईल.

वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी, कामगार आघाडी सभेचे संयोजक असून जिल्हा प्रभारी आणि राज्य समितीच्या सदस्या डॉ. क्रांतीताई सावंत, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा होत आहे.