अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार एकावर गुन्हा; दोन दिवसांची पोलिस कोठडी

सध्या अलीकडच्या काळात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अल्पवयीन मुलीला प्रेमाची फूस लावून तिच्याशी शरीरसंबंध ठेवत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्माईल इब्राहीम गड्डेकर (वय २३) असे त्याचे नांव असून या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

पिडीत मुलगी व संशयित गड्डेकर हे एकाच परिसरात राहण्यास आहेत. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही संशयिता तिला फूस लावत तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गड्डेकर याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.