येत्या सोमवारी आटपाडीत भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान! महाराष्ट्र केसरी मैदानात पाच लाखांच्या दोन कुस्त्या…

प्रत्येक शहरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.अनेक एक स्पर्धा घेतल्या जातात. तसेच मनोरंजनात्मक असे विविध कार्यक्रम योजले जातात. तसेच अनेक दिग्गजांच्या वाढदिवसानिमित्त देखील शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सोमवारी 30 डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांच्या वाढदिनी सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीने भव्य कुस्तीचे मैदान भरणार आहे.

या कुस्ती मैदानामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील मल्ल हजेरी लावणार आहेत. कुस्ती मैदानाचे उद्घाटन राज्याच्या तीन मंत्र्यांसह अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सभापती संतोष पुजारी यांनी दिलेली आहे. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांची कुस्ती आटपाडीकरांना पाहण्यास मिळणार आहे. यामध्ये पराभूत पैलवानास विजयी पैलवानाच्या बक्षीसातून 30 टक्के कमिशन दिले जाणार आहे. यामध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटात कुस्तीचे आयोजन केले गेलेले आहे. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांच्याबरोबर पंजाब केसरी भोला पंजाबी यांच्यात पाच लाखांची कुस्ती होणार आहे. महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख व हरियाणा केसरी पैलवान जयदीप कुमार यांच्यामध्ये लढत होणार आहे.