भिंगेवाडीजवळ अपघातात दोन ठार

आटपाडी – भिवघाट रस्त्यावर भिंगेवाडी गावाजवळ ट्रॅक्टर आणि व्हॅनच्या भीषण अपघातात व्हॅनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. वसंत उत्तम यादव (वय ४३) व आर्यन मोहिते (वय १८,दोघेही रा. कालेटेक,ता. कराड , जि. सातारा ) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना सोमवार,१५ रोजी रात्री साडेसात वाजता घडली.

व्हॅन (क्र. एमएच ११ एके ८७४५) आटपाडी शहरातून वेगाने भिवघाट दिशेने आटपाडी बसस्थानक परिसरातील सिद्धनाथ मंदिराजवळ व्हॅनची फिरोज लतीफ सय्यद यांच्या दुचाकीला धडक बसली. यात सय्यद जखमी झाले. आपल्या मागावर पोलीस येतील, या भीतीने चालकाने व्हॅन सुसाट वेगाने पुढे नेली. भिंगेवाडी येथे आटपाडीच्या दिशेने वीट वाहतूक वाहतूक करणाऱ्या करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीस त्याने मागून धडक दिली. ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉलीच्या मध्ये घुसल्याने व्हॅनचा चक्काचूर झाला. चालक वसंत यादव व त्याच्यासोबत असलेला आर्यन यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून व्हॅनचा पत्रा कापून दोन्ही मृतदेह बाहेर काढले. आटपाडी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह बाहेर काढले. आटपाडी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीस पाठविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आटपाडी पोलिसात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.