हातकणंगले परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी

पहाटे पासुनच जय भवानी जय शिवरायच्या जयघोषात हातकणंगले परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र शिवमय वातावरण झाल्याचे पहायला मिळाले. पन्हाळगडावरून शिवज्योत आणण्यासाठी शिवभक्त मोठ्या प्रमाणात जात होते तर सकाळी सहाच्या दरम्यान शिवज्योतीचे आगमन झाले. ठिकठिकाणी औक्षण करून शिवज्योतीचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. येथील बाबू जमाल तालिम मंडळ येथे मोफत मसाले दुधाचे वाटप करण्यात आले.


सायंकाळी मिरवणूक व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. एकंदरीतच पोवाडे, भगव्या पताका व उत्साही शिवभक्त यामुळे हातकणंगले परीसर शिवमय झाले होते. हातकणंगले व शहर परिसरात बाबु जमाल तालीम मंडळ, मोती तालिम मंडळ, छ. शिवाजी तालिम, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, तालीम मंडळे, शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन आले होते.