आटपाडी तालुक्यातील उबरगावच्या जगतराव बाबा गाढवे यांची ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून एक लाख वीस हजाराचीं फसवणूक माळशरस तालुक्यातील सुळेवाडी येथील तुळशीराम नामदेव गेजगे याने केली. याबाबत गाढवे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, तुळशीराम गेजगे या संशयिताने फिर्यादीकडून करारनामा करुन एक लाख वीस हजार रुपये घेऊन स्वतः ऊस तोडणी करता मजुर म्हणून येतो. म्हणजे एक कोयता म्हणजेच दोन मजूर ऊस तोडणी साठी पुरवतो. असे बोलून शब्द दिला होता.मात्र आजपर्यंत मजूर पुरवले नाहीत व मजूर पुरवण्यास टाळाटाळ करून फिर्यादीचा विश्वासघात करून फिर्यादीचे फसवणूक केल्याचे म्हटले आहे.
आटपाडी तालुक्यातील एकाची ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून फसवणूक
