श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहाच्या नुतनीकरणासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार आवाडे

महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजना अंतर्गत इचलकरंजी शहरातील श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहाच्या नुतनीकरणासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ७.९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामी मी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे नजीकच्या काळात महाराष्ट्रातील एक सर्वोत्तम नाट्यगृह साकारणार आहे. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह हे पुणेनंतरचे मोठे आणि सर्व सुविधांनीयुक्त असे नाट्यगृह आहे. सध्या श्रीमंत घोरपडे नाट्यगृहातील बहुतांशी यंत्रणा कालबाह्य झाली आहे.

नुतनीकरणाची आवश्यकता असलेने माजी आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नगर विकास विभागाकडून नाट्यगृहाच्या नुतनीकरणासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. १२०० आसन क्षमता असणारे हे परिसरातील एकमेव नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची निविदा लवकरच काढली जाणार आहे. या निधीतून संपूर्ण नाट्यगृहाचे नुतनीकरण होणार असून आसन व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, ध्वनी यंत्रणा, मेक-अप रूम फर्निचर, रंगमच उभारणी, शुद्ध पाण्याची व्यवस्था, सोलर यंत्रणा, प्रसाधनगृह आदी कामे केली जाणार आहेत.