सुंदर गाव अभियानमध्ये खरसुंडी गावचा तालुक्यात प्रथम क्रमांक जाहीर

सध्या अनेक भागात तसेच गावोगावी अनेक उपक्रम राबविले जातात. ते उपक्रम गावाच्या दृष्टीने खूपच फायदेशीर देखील असतात. शासनातर्फे देखील अनेक स्पर्धा देखील घेतल्या जातात. ज्यामध्ये सुंदर शाळा, सुंदर गाव ज्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळते. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावाला स्व. आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच तालुक्यातील व्दितीय क्रमांक आंबेवाडी तर तृतीय क्रमांक यमाजी पाटीलाचीवाडी यांना देण्यात आला आहे.

याबाबत पंचायत समिती पलूस गट विकास अधिकारी अरविंद माने यांच्या पथकाने अहवाल जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविलेला आहे. याबाबत पंचायत समिती पलूसच्या तपासणी पथकाने आटपाडी पंचायत समितीकडील ग्रामंपचायतीची स्व. आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना सन २०२३ २०२४ च्या आर्थिक वर्षांच्या तपासणी करीता २५ टक्के ग्रामपंचायतीची यादी प्राप्त झाली होती. त्यानुसार आटपाडी तालुक्यातील प्रथम खरसुंडी, व्दितीय आंबेवाडी व तृतीय य.पा. वाडी या गावांचा समावेश केला आहे. सुंदर गाव अभियानमध्ये खरसुंडीने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याने गावाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.