इचलकरंजी येथील पंचगंगा कारखान्याची निवडणूक बिनविरोध…

इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याची सन २०२५- २०३० सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये ५ नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली. निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर पी. एम. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आंनद साजरा केला. पी. एम. पाटील व संचालकानी स्व. रत्नाप्पाण्णांच्या समाधी स्थळ व पुर्णाकृती पुतळ्याचे दर्शन घेतले. स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या निधनानंतर पी. एम. पाटील यानी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध केली. तर सन २००५ पासून सलग पाचव्यांदा पी. एम. पाटील गटाची सत्ता प्रस्थापित  झाली आह. कारखान्याच्या सत्तेत येवू पहाणाच्या सौ. रजनी मगदूम व विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

‘अ’ वर्ग उस उत्पादक गटातून बिनविरोध  निवडून आलेले संचालक पी. एम. पाटील, कुमार भुपाल खुळ, प्रताप उर्फ बाबा शामराव पाटील, रावसाहेब बापू भगाटे, प्रताप नाथा नाईक, प्रकाश बाळकू खोबरे, प्रमोद पिरगोंडा पाटील तर नवीन चेहऱ्यामध्ये महावीर श्रीकांत चौगुले, बाबासो आण्णासो पाटील, विशाल रघुवीर आवटी, संजय तात्यासो देसाई व बापू भागोजी मोटे. अ वर्ग उत्पादक महिला गट सौ. रंजना लक्ष्मण निंबाळकर, सौ. शोभा रावसाहेब पाटील. ‘ब’ वर्ग व्यक्ती गट- संतोष विश्वंभर महाजन. ‘ब’ वर्ग संस्था प्रतिनिधी धनगोंडा बाळगोंडा पाटील. अनुसूचित जाती वर्ग उत्पादक – भुपाल लक्ष्मण मिसाळ असे १७ संचालक बिनविरोध निवडून आले.

शनिवारी अर्ज माघारीचे दिवशी ‘अ’ वर्ग ऊस उत्पादक सभासद गटातून २४ उमेदवारांपैकी १२ जणांनी माघार घेतली. ‘अ’ वर्ग ऊस उत्पादक सर्वसाधारण महिला प्रतिनिधी गटातून ४ पैकी २ महिलांनी माघार घेतली. तसेच ‘ब’ वर्ग व्यक्ती सभासदातून ६ पैकी ५ जणांनी व ‘ब’ वर्ग संस्था सभासदांतून ६ पैकी ५ जणांनी माघार घेतली. तसेच ‘अ’ वर्ग उत्पादक अनुसुचित जाती/जमाती मतदार संघातून भूपाल लक्ष्मण मिसाळ यांचा एकमेव अर्ज छाननी वेळी राहिल्याने ते बिनविरोध निवडून आले होते. संचालकांच्या एकूण १७ जागेसाठी पी. एम. पाटील गटाचे १७ उमेदवारांचे अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.