इचलकरंजीत उद्या मोगरा फुलला कार्यक्रम

उद्या म्हणजेच मंगळवारी पाच मार्च रोजी सकाळ इचलकरंजी कार्यालयाचा ३० वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने स्नेहमेळावा आणि ‘मोगरा फुलला’ हा भक्तिमय संगीत सोहळा सायंकाळी पाच वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात होणार आहे.

प्रख्यात प्रेरणादायी व्याख्याते गणेश शिंदे यांचे ज्ञानेश्वरीवर निरुपण होणार आहे, तर सन्मिता धापटे-शिंदे यांच्या सुरेल आवाजात संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या व अभंगांचे सादरीकरण केले जाणार आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या स्वास्थ्याविषयक अभंग व ओव्यावर आधारित निरुपण व संगीतमय असा हा कार्यक्रम असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.