काल मकर संक्रांतीचा सण मोट्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक भागात गल्लोगल्ली सुहासिनींचा हळदी कुंकू कार्यक्रम साजरे होताना पहायला मिळाले. प्रत्येक सुहासिनींच्या चेहऱ्यावर उत्साह होता. इचलकरंजी शहरात भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय येथे मकर संक्रांती दिना निमित्त तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता. या कार्यक्रमास भाजपा सदस्य नोंदणी अभियान प्रभारी श्री विजय भोजे, शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले, महिला आघाडी अध्यक्षा सौ अश्विनी कुबडगे उपस्थित होते.
यावेळी मकर संक्रांत हा सण सनातन धर्मात खूप महत्त्वाचा आहे. हा सण जानेवारी महिन्यात येतो आणि हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतात असे प्रतिपादन सदस्य नोंदणी अभियाना प्रभारी विजय भोजे यांनी केले. त्याबरोबर पौराणिक कथेनुसार, संक्रांतीदेवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, मकरसंक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.
त्यामुळे या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते असे शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले म्हणाले. यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकमेकांना तिळगूळ देऊन मोठ्या उत्साहात, आनंदाने शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला. यावेळी सरचिटणीस राजेश रजपुते, महिला आघाडीच्या सौ.निता भोसले, सौ.अमिता बिरंजे, सौ. उर्मिला गायकवाड, नागुबाई लोंढे, सुषमा पाटील, उपाध्यक्ष दिपक पाटील, मारुती पाथरवट, अनिस म्हालदार, दिपक कडोलकर, संजय गेजगे, सिध्दलिंग बुक्का, नितीन पडियार, लालचंद पारिख, राजु भाकरे, राजेंद्र पाटील, राजु बचाटे, भरत तमायचे यांच्यासह पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शहर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.