मोकाट कुत्र्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ

सध्या अनेक भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे तसेच रस्त्यांमध्ये खड्डे यांचे प्रमाण देखील वाढल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच सद्या अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. भिवघाट परिसरात गुहागर विजापूर महामार्गावर मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून, यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. भिवघाटमधील काही हॉटेल व्यावसायिक शिल्लक खाद्यपदार्थ महामार्गाच्या कडेलाच टाकत असल्याने ते खाण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील मोकाट कुत्र्यांचा वावर रस्त्याकडेला सतत असतो. हे कुत्र्यांचे कळप महामार्गावर दुचाकींच्या आडवे येत असल्याने अपघात वाढले आहेत. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी सध्या नागरिकांमधून मागणी होत आहे.