सध्या जास्तीत जास्त फसवणुकीच्या गुन्ह्यात जास्त वाढ झाल्याचे चित्र आहे. अनेकजण याला बळी देखील पडत आहेत. अनेक उपोषण, आंदोलन देखील या फसवणुकी विरोधात केले जातात.खासगी बचत गटाला फायनान्स देणाऱ्या कंपनीने महिलांची आर्थिक फसवणूक केली असून कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आटपाडी येथील महिलांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. महिलेला अटक करून तिच्याकडूनच वसुली करण्यात येणार असल्याचे आश्वासन फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी व पोलीसांनी दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगिती केले आहे.
संबंधित सलमा मुल्ला ही महिला सापडत नाही. तोपर्यंत कोणतीही वसुली होणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, आटपाडी येथील सलमा कमरुद्दीन मुल्ला व कमरुद्दीन आलम मुल्ला यांनी बचत गट करून ‘ग्रामीण कुट्टा, बंधन बैंक, भारत फायनान्स, चैतन्य फायनान्स’ यासारख्या फायनान्स कंपन्याकडून महिलांना व्यवसायासाठी मदत, घरगुती अडचणी सोडविण्याकरिता अल्प दराने व्याज आकारून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
त्याप्रमाणे महिलांनी कागदपत्रे तयार करून सलमा कमरुद्दीन मुल्ला यांना दिली होती. या कागदपत्रांचा वापर करून सलमा मुल्ला हिने बचत करणाऱ्या महिलांच्या परस्पर कर्जाची रक्कम उचलली. सलमा ही पैसे घेऊन पसार झाली आहे.
सिस्कॉम एंटरटेनमेंट अँड लीजर एलएमडी. यूके (ईऑनेट कम्युनिटी) या फायनान्स कंपनीचे स्वाती खाकमकर, विशाल खामकर, पंकज जगताप (कोल्हापूर), दीपक महाजन (इचलकरंजी), सलाम कमरुद्दीन मुल्ला व कमरुद्दीन मुल्ला ‘यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
