कोणत्याही उद्योग, व्यवसायात आपला सेवक वर्ग महिला, भगिनी यांच्याशी जोडलेला स्नेहपूर्ण संबंध हा उद्योगाच्या यशाचा पाया बनतो, असे मत आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले. येथील उद्योजक दीपक कोठावळे आणि डॉ. नीलम शहा यांनी सुरू केलेल्या एस. के. गारमेंट इंडस्ट्रीच्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन आ. पाटील यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.पोलिस निरीक्षक संजय हारुगडे, तेजस्विनी गारमेंटचे विकास खन्ना, उद्योजक मुरली शेट्टी, ग्राहक पंचायतीचे बी. जी. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. नीलम शहा यांनी स्वागत केले. उत्पादनांचा उत्तम दर्जा, सेवकांशी कायमचे दृढ नाते या बळावर आपला व्यवसाय सुरू असल्याचे दीपक कोठावळे यांनी सांगितले. कॉ. धनाजी गुरव यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. प्रदीप शहा यांनी आभार मानले. गायक इरफान शेख यांनी सूत्रसंचालन केले.
सेवकांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवा : आ. जयंत पाटील
