लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलली तसेच अनके पक्षप्रवेश देखील पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. महायुतीचे सरकार स्थापन झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्यानंतर टीका झाल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांना नियम बदलून शिंदेंना समितीत घेतलं.त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा शिंदेंच्या खासदार आणि आमदारांकडे वळवला आहे. राज्यातील पोलिसांचे अपुरे मनुष्य बळाचे कारण देत आमदार आणि खासदारांची पोलिस सुरक्षा काढून घेण्याचा निर्णयाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदेंच्या आमदार खासदारांना बसला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची पोलिस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभागाला दिल्या आहेत.पोलिस दलातील अपुरे मनुष्यबळ आणि वाढता ताण लक्षात घेऊन राज्यातील आमदार, खासदारांना पुरवली जाणारी विशेष पोलिस सुरक्षा काढण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच फडणवीस यांनी याबाबत गृह खात्याला दिला आहे. पण जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची पोलिस सुरक्षा कायम ठेवली आहे.
राज्यात पोलिसांचे असलेले अपुरे बळ त्यात लोकप्रतिनिधींना दिली जाणारी सुरक्षा यामुळे पोलिस यंत्रणावर ताण पडत आहे. खासदार आणि आमदारांच्या सुरक्षासाठी अनेक पोलीस त्यात अडकून पडल्याने त्याचा परिणाम पोलीस यंत्रणेवर होत आहे. परिणामी अशा खासदार आणि आमदारांवरील विशेष पोलीस सुरक्षा काढून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
त्यानुसार जिल्ह्यातील शिंदेंच्यासेनेच्या खासदार आमदारांच्या सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. पोलिस सुरक्षा थांबल्यामुळे लोकप्रतिनिधींना गरजेनुसार खासगी सुरक्षा घ्यावी लागणार आहे. दरम्यान यापुढे राज्यमंत्र्यांना देखील एकच पोलिस सुरक्षेसाठी मिळणार आहे. त्यामुळे भाजपमधील राज्यमंत्र्यांना देखील याचा फटका बसला आहे.