विटा लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक माजी आ. अॅड. सदाशिवराव पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दलच्या विद्यार्थी व प्राध्यापक यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ प्रकाश मोकाशी म्हणाले, विद्याथ्र्यांनी स्पर्धेच्या युगात अव्वल स्थानी असणं आवश्यक आहे अद्ययावत ज्ञान व कौशल्याच्या जोरावर महाविद्यालयाचे व आपले नाव उज्ज्वल करावे. यावेळी संचालिका पूजा पाटील प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्राचार्य व्ही. एम. शिंदे सी. टी. एस. पाटील, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेता लागिर झालं जीफेम नितीश चव्हाण उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी अँड. वैभव पाटील उपस्थित होते. सिनेअभिनेता नितीश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत यशाचा मूलमंत्र दिला.
यशस्वी होण्यासाठी मेहनत व सातत्य अत्यंत आवश्यक आहे मराठी चित्रपटसृष्टीत नवीन कलाकारांना भविष्य नक्कीच आहे त्यासाठी आपण मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट आपण पाहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये गायन, वादन, नृत्य कला आविष्कार सादर केला.