विट्यामध्ये खानापूर रस्त्यावर चारचाकीचा भीषण अपघात!

अलीकडच्या काळामध्ये अपघाताच्या अनेक बातम्या आपल्या कानी पडत असतात. या अपघातामध्ये अनेक जणांचे प्राण देखील गमावलेले आपण पाहिलेच असतील. तर असाच एक अपघात विट्यातील खानापूर रस्त्यावर चार चाकीचा झालेला आहे.

बळवंत कॉलेजच्या समोरील वळणावर हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये चार चाकी चा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या साईड बॅरियरवर ही चारचाकी घुसून हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये चार चाकी चालक हा गंभीर जखमी झालेला आहे.

अपघातामध्ये गंभीर जखमी बळवंत कॉलेजमधील शिपाई असल्याची माहिती मिळत आहे. चार चाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. जखमी चालकाला विट्यातील ओम श्री रुग्णालयात दाखल करण्यात आलेल आहे