वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीत कारखानदार वर्ग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीतील श्री गणपती टेक्स्टाईल कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. या आगीमध्ये इमारतीचे बांधकाम, मशिनरी, कच्चा माल आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झालेली नव्हती.
पार्वती औद्योगिक वसाहती मधील टेक्सटाईल कंपनीस आग लागून दीड कोटींचे नुकसान….
