रणरागिणी ताराराणी यांनी पन्हाळगडावर करवीर संस्थानची स्थापना करून रयतेच्या स्वराज्याचे रक्षण केले. त्यांच्या या स्फूर्तिदायी इतिहासाची साक्ष देणारा पुतळा पन्हाळगडावरील ताराराणी यांच्या वाड्यासमोर उभारण्यासाठी पाठपुरावा करणार, अशी घोषणा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केली.
