हातकणंगले तालुक्यातील रुई येथील दोन समाजात सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ववैमनस्यावरून झालेल्या मारामारीत एका तरुणाचा खून झाला होता. त्यानंतर गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावरून गावातील दोन समाजातील तरुणांत पुन्हा शनिवारी सायंकाळी वाद झाला या त्यात जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. अनिकेत काकास साठे (वय १९, रा. साठेनगर, रुई) याने तिघांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये राहुल तराळ, हर्षद कांबळे, सिद्दीकी शब्बीर नदाफ (सर्व रा. मानेगर, रुई) यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
अनिकेत साठे हा आपला मित्र पणू साठे याच्यासोबत मोटरसायकलवरुन रुई फाटा येथे निघाला होता. याचदरम्यान, राहुल तराळ, हर्षद कांबळे व सिद्दीकी नदाफ यांनी पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन अनिकेत साठे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानुसार अनिकेत साठे याने हातकणंगले पोलीस ठाण्यात सदर तिघांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिघांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती हातकणंगले पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास पोहेकॉ घुगरे हे करीत आहेत.
