अंबप येथे प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत महिलांचा ऐतिहासिक निर्णय

काल मोठ्या उत्साहात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हातकणंगले तालुक्यात देखील मोठ्या उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी ध्वजावंदन झाल्यानंतर ग्रामसभा ग्रामपंचायतच्या पटांगणात घेण्यात आली. ग्रामसभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विविध विषय मंजूर झाल्यानंतर अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सरपंच दीप्ती माने यांनी मांडला. याला उपस्थित महिलांनी हात वर करून अनुमती दर्शविली.

यावेळी विषय पटलावरील विविध विषयावर चर्चा करण्यात आली. उपस्थित प्रश्नांना सरपंच दीप्ती माने यांनी उत्तरे दिली. ग्रामपंचायत अधिकारी डी.व्ही.शिंदे यांनी सचिव म्हणून काम पाहिले. अंबप येथील महिलांनी अनिष्ट विधवा प्रथेला तिलांजली देत विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत घेतला. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दिप्ती माने होत्या.