सध्या अनेक भागात गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झालेली आहे. विटा येथे एमडी ड्रग्ज साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलिसांनी नेमके किती कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले हे मात्र समजू शकले नाही.
सांगली जिल्ह्यात एमडी ड्रग्जप्रकरणी ही तिसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी कुपवाड आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावांमध्ये एमडी ड्रग्जच्या साठ्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे 500 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. आता विट्यात एमडी ड्रग्जच्या साठावर छापा टाकण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईबाबत मात्र पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळली होती.
याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी अमली पदार्थावर कारवाई केली आहे. एमडी ड्रग्ज आहे की नाही हे तपासणी केल्यानंतरच समोर येईल, असे सांगितले.