उद्यापासून बहेत विशाळी यात्रेस सुरुवात, बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस

वाळवा तालुक्यातील बहे येथील श्री रामलिंग बेटावरील विशाळी यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विविध गावातून लोक या यात्रेसाठी गर्दी करीत असतात. हि यात्रा उद्या २९ व ३० जानेवारी रोजी साजरी होणार आहे. पौष आमावस्येला बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे.

तीर्थक्षेत्र व रामलिंग बेटावर रामनवमी, हनुमान जयंती व दासनवमी दरवर्षी उत्साहात साजरे होते. यंदा २९ व ३० जानेवारी रोजी विशाळी यात्रा होत आहे. बहेसह तांबवे, नरसिंहपूर, शिरटे आदी गावातील भाविकांचे रामलिंग बेटावरील राममंदिर श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रातून हजारो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात.