सिनेअभिनेत्री माधुरी पवार व मा. आ. दिपकआबा यांच्या शुभहस्ते हॉटेल सवडचे शानदार उद्घाटन

सांगोला तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखीस आहे. या ठिकाणी पाण्याच्या टंचाई ला सामोरे जावे लागते. पण अलीकडच्या काळात पाण्याचा प्रश्न सुटू लागला आहे. सध्या अनेक विकासकामे सांगोला तालुक्यात सुरु आहेत. आता यात आणखी एक भर पडली आहे. हॉटेल सवड हे हॉटेल चांगल्या रस्त्यावर आणि सुदंर इमारतीत सुरू झाले आहे. पुणे, मुंबई, बेंगलोर या शहरातील फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये असणाऱ्या व्यवस्थेप्रमाणे याही ठिकाणी अत्याधुनिक पध्दतीने व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेल सवडमुळे सांगोला तालुक्यात नवीन  पध्दतीची भर पडली आहे. याचे मनाला खूप मोठे समाधान मिळाले आहे.

बाबर कुटुंबियांनी अद्ययावत हॉटेल उभे केले असून जागेचा चांगला उपयोग केला आहे. बाबर बंधूचा इतर तरुणांनी आदर्श घेवून इतर चांगल्या उद्योग व्यवसायाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा मा.आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांनी व्यक्त केली. प्रदिप विलास बाबर यांनी बिलेवाडी स्टॉप पंढरपूर रोड येथे नव्यानेच सुरु करत असलेल्या हॉटेल  सवडचा उद्घाटन सोहळा सिनेअभिनेत्री माधुरी पवार व मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते सांगोला शहरातील पंढरपूर रोडवरील बिले स्टॉप येथे नुकतेच संपन्न झाला.

यावेळी अभिनेत्री माधुरी पवार म्हणाल्या की, उद्योजकता क्षेत्रामध्ये मराठी माणूस नेहमी आग्रेसर आहे, व तो राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत लढायचे अशी शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाला दिली आहे. हा संघर्ष सर्व मराठी तरूणांमध्ये दिसतो असे सांगत सांगोल्यातील तरूण तडफदार उद्योजक प्रदीप बाबर यांनी हॉटेल सवड सुरू केले आहे. त्या भरभराटीस नेण्यासाठी आपल्यासारख्या नागरिकांनी सहकार्य करावे व ते आपण कराल असे त्यांनी सांगितले. तसेच हॉटेल सवडच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.